हैदराबाद। भारताची बॅडमिटनपटू पी.व्ही सिंधू हिने इंडिया ओपन जिंकत धमाका उडवून दिला आहे. सिंधूची नजर टॉप वर्ल्ड रॅकिंगवर लागली असून यापूर्वी साईना नेहवालने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळविले होते. सिंधू या स्थानावर पोहोचली तर ती दुसरी भारतीय खेळाडू ठरणार आहे.
रिओ ऑलिंपिकमध्ये गोल्डने हुलकावणी दिल्यानंतर ’त्या’ पराभवाचा वचपा भारताची बॅडमिटनपटू पी.व्ही सिंधू हिने इंडिया ओपनवर आपली मोहर उमटवून घेतला. या वेळी सलग दुसर्यावेळी तिच्यासमोर असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारीनला पराभवाची धूळ चाटवून सिंधूने यश खेचून आणले व बीएफडब्ल्यू मे लाईफ योनेक्स सनराईज इंडिया खिताब जिंकला. या सामन्यात सिंधूने 21-19,21-16 अशी मात मारीनला दिली. सिंधूने रिओ ऑलिंपिक्स नंतर डिसेंबर 2016 मध्ये दुबई वर्ल्ड सुपर सिरीजच्या फायनलमध्येही मारिनाला हरविले होते. इंडिया ओपनमध्ये फक्त 47 मिनिटांत सिंधूने विजय मिळविला व मारीनला एकही संधी मिळू दिली नाही.