नवी दिल्ली । क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही.सिंधूची देशातील तिसर्या सर्वोच्च नागरी पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. याशिवाय देशाला ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्यपदक जिंकून देणार्या खाशबा जाधवांच्या नावाची शिफारस पद्मश्री पुरस्कारसाठी करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयातील अधिकार्याने सांगितले की, सिंधूची पद्मभूषण पुरास्कारासाठी आणि खाशबा जाधव यांची पद्मश्री किताबासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने आपल्या शिफारशी पुढील निर्णयासाठी गृहमंत्रालयाकडे पाठवल्या आहेत. जागतिक स्पर्धेत दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक जिंकणारी सिंधू ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली बॅडय गेल्या महिन्यात ग्लासगो जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. बॅडमिंटनमधील या देदीप्यमान कामगिरीमुळेच तिच्या नावाची पद्मभूमिंटनपटू आहे. हैदराबादच्या 22 वर्षीय सिंधूने 2016 मध्ये चायना ओपन सुपर सीरिज प्रीमिअर, इंडियन ओपन सुपर सीरिज या स्पर्धांशिवाषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
खाशाबा जाधव यांना पद्मश्री
देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिकपदक मिळवून देणारे खाशाबा जाधवा आतापर्यंत दुर्लक्षितच होते. मृत्यूनंतर तब्बल 33 वर्षांनी जाधव यांच्या नावाची पद्मश्री किताबासाठी शिफारस करण्यात आली आहे. जाधव यांना पद्म पुरस्कार आणि त्यांच्या नावाने असलेल्या कुस्ती अकादमीसाठी निधी न दिल्यास जाधव यांच्या ऑलिम्पिकपदकाचा लिलाव करण्याची धमकी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. 1952 मधील हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव कांस्यपदकाचे मानकरी ठरले होते.