टोकियो । जपान ओपन सुपर सीरिज स्पर्धेत गुरुवार भारतीय खेळांडूसाठी संमिश्र यशाचा ठरला. महिला एकेरीच्या लढतीत पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना दुसर्या फेरीत पराभव पत्कारायला लागला. तर पुरुष एकेरीच्या लढतींमध्ये किदंबी श्रीकांत आणि एच.एस.प्रणॉय यांनी मात्र दुसरी फेरी जिंकत स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.एक महिन्यापेक्शा कमी कालावधीत तीन वेळा समोरासमोर आलेल्या नोझोमी ओकुहाराने यावेळी मात्र सिधूंवर सरशी मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. दुसर्या फेरीच्या लढतीत अनेक चुका केल्याने सिंधूला पराभूत व्हावे लागले. ओकुहाराने हा सामना21-8, 21-8 असा जिंकला. महिला एकेरीतील अन्य लढतीत स्पेनच्या कॅरोलिन मरिनने माजी नंबर वन सायना नेहवालला 21-16, 21-13 असा पराभव केला. पुरुषांच्या एकेरीच्या लढतीत स्पर्धेच्या तिसर्या फेरीत स्थान मिळवणारा प्रणॉय पहिला भारतीय खेळाडू ठरला. प्रणॉयने चायनिज तैपईच्या हस्यु जेन हाओचा आणि श्रीकांतने हाँगकाँगच्या हु युनचा 21-12, 21-11 असा पराभव केला.
भारताच्या पी. व्ही. सिंधूसाठी गुरुवार थोडे आसू थोडी खूशी असा ठरला. जपान ओपन स्पर्धेत यजमानांच्या नोझोमी ओकुहाराकडून दुसर्या फेरीत पराभूत झालेल्या सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दोन क्रमाकांनी उडी मारताना पुन्हा एकदा दुसरे स्थान मिळवले आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातही सिंधूने दुसर्या क्रमांकावर झेप घेतली होती. पण गुरुवारी जपानच्या नोझोमी ओकुहाराने दुसर्या फेरीत हरवल्यामुळे पुढील आठवड्यात सिंधूच्या मानाकंनात घसरण होण्याची शक्यता आहे.
तिसर्या फेरीत श्रीकांतसमोर विश्वविजेता विक्टर अॅक्सेलसेन याच्याशी होईल. प्रणॉयने हाओवर 21-16, 23-21 असा विजय मिळवला. या दोघांच्या तुलनेत सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेचा विजेता समीर वर्मा कमनशिबी ठरला. ऑल इंग्लंड विजेत्या चीनच्या शी युकीने तिसर्या गेमपर्यत रंगलेल्या लढतीत समीरचे आव्हान 10-21, 21-17, 21-15 असा पराभव केला.