किंग्जस्टन । जिनेव्हा फिडे ग्रापी बुद्धिबळ स्पर्धेतील दुसर्या फेरीत भारताचा ग्रॅन्डमास्टर पी. हरिकृष्णने जोरदार प्रतिक- ार करत ब्रिटनचा ग्रॅण्ड मास्टर मायकेल अॅडम्सला बरोबरीत रोखले. पांढर्या मोहर्यांनी खेळणार्या हरिकृष्णने आक्रमक सुरुवात करत अॅडमला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केले. पण अॅडमने योग्य चाली रचत हरिकृष्णला बॅकफूटवर जायला भाग पाडले होते. या दरम्यान हरिकष्णला अडचणीत आणत अॅडमला विजय मिळवण्याची संधीही मिळाली होती. पण वेळेअभावी त्याला बरोबरी मान्य करावी लागली सुरुवातीच्या खेळामध्ये मी सुस्थितीत होतो.
त्यानंतर अॅडमने चांगल्या चाली रचल्या. त्यामुळे त्याची बाजू वरचढ झाली होती. अशापरिस्थितीत त्याने बरोबरीचा प्रस्ताव ठेवल्यामुळे मी तो मान्य केला असे हरिकृष्णने सामना संपल्यानंतर सांगितले.