पुंडलेश्‍वर संस्थेतर्फे झाले वृक्षारोपण

0

भुसावळ । येथील महालक्ष्मी गृप व पुंडलेश्‍वर बहुउद्देशीय विकास संस्थेच्या विद्यमाने सद्गुरु तोताराम महाराज समाधी संस्थान परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वड, पिंपळ, निंब, आवळा, वेल, रुद्राक्ष, चिंच आदी 100 वृक्षांचे रोपण करण्यात आले. या रोपांची निगा राखण्यासाठी ट्री गार्ड तसेच ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली. महालक्ष्मी गृपच्या 16 सदस्यांनी सपत्निक वृक्षारोपण केले.

याप्रसंगी मू.जे. महाविद्यालयाचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व शिवयोग फोरमच्या सभासदांतर्फे दुर्गा, सप्तशती साधना घेण्यात आली. यावेळी पंडीत भिरुड, वसंत भोगे, अनिल पाटील, सुपडू भंगाळे, दिलीप महाजन, अरुण धांडे, प्रकाश चौधरी, अशोक कोलते, रुपचंद भंगाळे, चंद्रकांत पाटील, संजय कुरकुरे उपस्थित होते.