अमळनेर । पुज्य साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या उभारणीसाठी लागणार्या निधीच्या संकलना करिता येथील नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या समाजस्वास्थ्य नाटकाच्या प्रयोगाने अमळनेरातील सर्व श्रोत्यांची मने ढवळून निघाली आहे. रुढीवादी समाजातील जाचक परंपरा आणि त्यावर समाजातील लोकांना समाजस्वास्थ्य या मासिकातून कर्वेनी दिलेले लैंगिक शिक्षण या जनजागृतीतून त्याच्यावर सनातनी आणि शासनकर्त्यांनी वेळोवेळी भरलेले खटले.
यातून कसाबसा समाजाला या शिक्षणाविषयी रघुनाथ धोंडो कर्वेनी 1930 ते 1947 या काळात आपल्या मासिकाद्वारे दिलेली माहिती ही त्याकाळात लज्जास्पद मानली जात असे, यामुळेच त्यांच्यावर वेगवेगळ्या विषयांना अनुसरून भरण्यात आलेले खटले, सत्य परिस्थितीची जाण असतांनाही त्यांच्या विरोधात होत असलेल्या खटल्याच्या निर्णय आणि त्यांना हे मासिक बंद व्हावे, म्हणून कोर्टात दर तारखेला फिरविणे या सार्या परिस्थितून जात असतांनाही मासिक तोट्यात जाऊन चालवणे ही कला जोपासणे हेच पुण्यातील अतुल पेठे यांनी या नाटकाच्या प्रयोगातून अमळनेरकरांच्या समोर 1930 ते 1947 हा स्वातंत्र्य पूर्वीचा काळ उपस्थितांन समोर आणल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. या नाटकाच्या प्रयोगातून जमा झालेला हा निधी गलवाडे रोड येथे सुरू असलेल्या पु साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला देण्यात आला आहे.