व्हिजन अॅकडमीतर्फे ‘माझा भारत’ या विषयावर चित्रकला स्पर्धा
भुसावळ- 15 ऑगस्ट हा आपल्या देशाच्या इतिहासातला एक अभिमानाचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आजकाल मुलांच्या, घरच्या जबाबदार्या पूर्ण करता करता पालकांची दमछाक होते हे खरं. पण आपण भारतीय नागरीक आहोत हे विसरणं योग्य नाही. आपल्या पुढच्या पिढीला आपले स्वातंत्र्य-सेनानी, त्यांचे पराक्रम, त्याग, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारकं यांची माहिती मिळायला हवी, असे प्रतिपादन व्हिजन अॅकडमीच्या संचालिका प्रा.सीमा पाटील यांनी येथे केले. शहरातील श्रीनगर, जळगाव रोड येथे रविवारी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रा.धीरज पाटील, देवेंद्र पाटील, प्रतीक सोनवणे, अमोल पाटील, उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यक्तिमत्व विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अॅकडमीतर्फे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात.
तीन गटात झाली बाल चित्रकला स्पर्धा
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जळगाव रोडवरील श्रीनगर भागातील व्हिजन अॅकडमीत रविवार, 12 रोजी सकाळी 10 वाजता चित्रकला स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. सात वर्षांपर्यंतचा गट, 7 ते 12 वर्षे आणि 12 ते 16 वर्षे या गटात मानसी गुळवे, सोहम कोळी, जय वायकोळे, वेदिका पाटील, ओम कोळी, धनश्री कोळी, ऐश्वर्या नारखेडे, ऋतुजा पाटील, दिव्याश्री कुंभार, राधा कोळी, साक्षी झोपे, मोहित पाटील, यश तायडे, पायल तायडे, हिमांशू प्रदास, तेजस फेगडे, वरुण भारंबे, शिवांशु प्रदास, दिग्विजय पाटील, दीपक पाटील, श्वेता फेगडे, रोहित साळी, वेदांत फेगडे आदींनी सहभाग घेतला.
23 विद्यार्थ्यांनी रेखाटले चित्र
चलेजाव चळवळ, 1857 चा उठाव, मीठ सत्याग्रह, स्वदेशी आंदोलन, तसेच विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने शाळेत शिकवलेला इतिहास चित्राद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला. काहींनी ‘गांधी’, ‘सरदार’, ‘शहीद भगतसिंग’, ‘लगान’, ‘स्वदेस’ आदी मुलांवर प्रभाव टाकणारे चित्रपटातील दृश्य रेखाटले. स्वातंत्र्याच्या लढाईची प्रतीकं असणार्या स्मारकांची, इंडिया गेट, जालियनवाला बाग, भगुरमधलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक किंवा लाल किल्ल्यासारख्या ऐतिहासिक महत्त्व असणार्या स्थळांचे चित्र काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.