पुढील तीन महिन्यात गंगा ८० टक्के क्लीन होईल-नितीन गडकरी

0

नवी दिल्ली-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘क्लीन गंगा मिशन’बाबत मोठे विधान केले आहे. पुढील तीन महिन्यात ८० टक्के गंगा स्वच्छ होईल असे सांगितले आहे. २०२० मार्च पर्यंत गंगा पूर्णपणे स्वच्छ होईल असे सांगितले.

नमामि गंगे कार्यक्रमाअंतर्गत यमुना नदी सफाईसाठी ११ प्रकल्प राबिण्यात येणार आहे. २०१८ गंगा स्वच्छतेची डेडलाईन ठेवण्यात आली होती. मात्र या मुदतीत गंगा स्वच्छ होऊ शकली नाही. त्यामुळे नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने याबाबत नाराजी व्यक्त केली.

२०१९ पर्यंत यमुना नदी स्वच्छ करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. त्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आहे.