पुढील तीन वर्षांत ९ लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता

0

मुंबई : देशातील ई-कॉमर्स उद्योगाचा विस्तार व डिजिटायझेशनमुळे आर्थिक सेवा, बँकिंग व विमा क्षेत्रात (बीएफएसआय) पुढील  तीन वर्षांत ९ लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या प्रामुख्याने मुंबई व पुणेसह ९ शहरांमध्ये असतील. ‘टीमलीझ सर्व्हिसेस’ने हा अंदाज वर्तवला आहे.

बंगळुरूमध्ये कर्मचाऱ्याचे सरासरी मासिक वेतन देशात सर्वाधिक १.२९ लाख रुपये इतके असेल. त्यापाठोपाठ दिल्लीतील १.२६ लाख व अहमदाबादमध्ये १.२५ लाख रुपये असेल, असा अंदाज आहे. यामध्ये पुणे चौथ्या व मुंबई पाचव्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

सध्या ई-कॉमर्स आणि अ‍ॅप आधारित उद्योगांचा झपाट्याने प्रसार होत आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. आगामी काळात आयटीची राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूमध्ये काम करणाºया कर्मचाºयांना सर्वाधिक १२.६३ टक्के इतकी वेतनवाढ मिळू शकणार आहे. त्यापाठोपाठ दिल्लीत १२.२६ टक्के व पुण्यातील कर्मचाºयांना ११.१४ टक्के वेतनवाढ मिळेल असा अंदाज आहे.