शिंदखेडा । जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. या योजनेअंर्तगत सन 2018-19 साठी धुळे जिल्ह्यातील चार तालुके मिळून 137 गावे निवडण्यात आली असून या योजनेत कोणती कामे प्राधान्याने घ्यावीत, यासाठी गावात शिवार फेर्यांचे नियोजन करण्यात येत आहे. या गावामध्ये पुढील पंधरवाडयात शिवार फेरी होणार असल्याची माहिती तालूका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली. या शिवार फेर्यात प्रांताधिकारी व विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. यंदाच्या वर्षी कृती आराखडा शिवार फेरीनंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात येणार आहे.
दुष्काळी परीस्थिती बदलणे, जमिनीतील पाणी पातळी वाढविण्रासाठी राज्यशासनाने अनेक योजना हाती घेतल्या त्यातील एक म्हणजे जलयुक्त शिवार. गेल्या तीन वर्षांपासून ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. आगामी सन 2018-19 या वर्षातही जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील 137 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात धुळे तालुक्यातील 41, साक्री तालुक्यातील 45, शिंदखेडा तालुक्यातील 20 तर शिरपूर तालुक्यातील 31 गावांचा समावेश आहे. या योजनेअंर्तगत जि.प.च्या लघूसिंचन, सार्वजनिक बांधकाम, कृषी, जलसंपदा, वन या विभागांकडून बंधार्यातील गाळ काढणे व दुरुस्ती, जलपुर्नभरण, वृक्षारोपण, कपार्मेंट बंडींग आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रांताधिकारी व विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी शिवार फेरी करून प्राधान्याने कोणती कामे घ्यावीत याचे नियोजन करण्यात येणार आहे.
योजनेअंर्तगत घेतलेली गावे
योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या गावांमध्ये धुळे तालुक्यातील देऊर बु, देऊर खु, दिवाणमाळ, दोंदवड, बांबुर्ले प्र.नेर, कुलथे, लोहगड, लोणखेडी, महाल कंदमाना, म.कासद, म.पंढरी, म.राइवत, नवा कोठारे, पिंपरखेड, तामसवाडी, रावेर, सावळदे, तिखी, उंभड, उडाणे, वाणी खु, आर्णी, बाभुळवाडी, बिलाडी, काळखेडे, कुंडाणे, मलाणे, नंदाणे, नवलनगर, नावरी, निमखेडी, सोनगिर, सुकवद, प्र.डांगरी, वजीरखेड, वणी बु.,वरखेडे, विश्वनाथ, वडेल, वडगाव, फागणे, साक्री तालुक्यातील आयणे, अंबापूर, आमखेल, बागुलनगर, बासर, भोरटीपाडा, ब्राम्हणवेल, बुरूडखे, दापुर, देवजीपाडा, देवळीपाडा, धाडणे, धंगाई, ढोलीपाडा, डोंगरपाडा, गंगापूर, गोंदास, गुलनारे, हनुमंतपाडा, हट्टी बु., होंडदाणे, ईच्छापूर, जामकी, कैलासनगर, कळंभरी, करंझटी, खैरखुंटा, कोकले, कुहेरस, लाघळवाळ, लखाळे, लव्हारदोडी, लोनखेडे, मालखेडे, मापलगांव, मावजीपाडा, नागझिरी नागपूर, नांदरखी नवडणे, नवेनगर, पंचमौली, फोफरे, पिंजारझाडी, रायकोट, शिंदखेडा तालुक्यातील कदाणे, महाळपूर, रूदाणे, चावळदे, दाऊळ रामी टाकरखेडा अजंदे बु. अक्कडसे, अक्कलकोस, भिलाने दिगर, कलवाडे, पढावद, परसोळे, पिंप्राड, सार्वे, सोंडले, सोनेवाडी, वरपाडे तर शिरपूर तालुक्यातील अभणपुर खु.,अंजणपाडा, अंतुर्ली, अर्थे खु., बाभुळदे, बाळदे, भिलारदेवपाडा, भोईटी, धवळीविहीर, फॉरेस्ट, गॅप, गिधाडे, हिंगोणी बु., जवखेडे, खर्देबु., खर्दे खु, लोंदनारे, महादेव दोंदवाडे, माळापूर(अनेरडॅम), ममाने, पाथर्दे, रोहीणी, साकवद, सावळदे, तोंदे, उखळवाडी, उंटावद, उप्परपिंड, वडलेखु., वरूळ, वरवाडे आदी गावांचा समावेश आहे.
मागील स्थिती
जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत गेल्या वर्षी सन 2017-18 या वर्षात शिंदखेडा तालुक्यातील 24 गावे निवडण्यात आली होती. नऊ विभागात 29 कोटी रूपयांची 549 कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही कामे अद्यापही सुरू आहेत.