पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री मीच

0

नागपूर :वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये. मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे’, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस  यांनी शनिवारी दिली.

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५५वा स्थापना दिन आणि व्हीआयए-सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, उद्योजक सत्यनाराण नुवाल, नितीन खारा उपस्थित होते. विदर्भ व मराठवाडा व अनुसूचित क्षेत्रात उद्योगांना चालना मिळावी, म्हणून वीज दरात सवलत दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना कमी सवलत मिळणार असून नवीन उद्योगांना देखील याचा लाभ मिळत आहे. पण हे वीजदर मार्च २०१९ पर्यंत निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे मार्चनंतरही उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.