पुढील राष्ट्रपती शरद पवारच होणार; संजय राऊतांच्या मोटबांधणीला सुरुवात !

0

मुंबई: राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामागील राजकारण संपूर्ण देशाला ज्ञात आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाविरोधी सर्व पक्षांची मोट बांधणी करून २०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती करण्याचे प्रयत्न राऊत यांनी सुरू केले आहेत. संजय राऊत यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र करून २०२२ पर्यंत राष्ट्रपती हा भाजपशिवाय होईल असा दावा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात शरद पवार आणि संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी राऊत यांनी अनेकदा पवारांची भेट घेतली होती. आता राऊत देशातील भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करणार आहेत. २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतरचे राष्ट्रपती पवार व्हावेत, यासाठी राऊत यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.