नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि डीएमके प्रमुख एमके स्टालिनमध्ये वाढत असलेल्या जवळीकीमुळे पुढील वर्षी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे तमिळनाडूमधून राज्यसभेवर जातील अशी चर्चा आहे. सध्या मनमोहनसिंग हे आसाममधून राज्यसभेवर गेलेले आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपतो आहे. त्यामुळे ते पुढील वर्षी तमिळनाडूमधून राज्यसभेवर पाठविले जातील असे सांगण्यात येत आहे.
पुढील वर्षी तमिळनाडूमध्ये ६ जागांवर निवडणुका होणार आहे. सध्या डीएमके आणि कॉंग्रसमधील जवळीकता वाढली आहे. डीएमके नेते स्टालिन यांनी राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य असल्याचे सांगितले होते.