चाळीसगाव : सवलतीच्या दरात आठ दिवसाच्या वही महोत्सवाला अपेक्षेपेक्षा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला दोन दिवस महोत्सवाची मुदत वाढवावी लागली तब्बल पन्नास लाखांच्या वह्यांची सवलतीच्या दरात विक्री करून सर्वसामान्य पालकांचे पंधरा ते वीस लाख रुपयांची बचत करता आली आहे. याचे व्यक्तिशः मला समाधान असून पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या प्रमाणावर शालेय साहित्य महोत्सव आयोजित करून विद्यार्थी व पालकांची समाजसेवा करू अशी माहिती भाजप राज्य किसान मोर्च्याचे सरचिटणीस कैलास सूर्यवंशी यांनी वही महोत्सव समारोपाच्या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पालकांनी घेतला लाभ
यावेळी बाजार समितीचे उप सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील युवा मोर्च्या चे जिल्हा पदाधिकारी विवेक चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कैलास सूर्यवंशी यांनी गेल्या दहा दिवसांत आलेले पालकांचे अनुभव कथन केले व त्यामधून मला प्रेरणा मिळाली पंधरा लाखांच्या वही विक्रीचा अंदाज होता मात्र 40 टक्के सवलतीचा लाभ पालकांनी मोठ्या प्रमाणावर घेतल्याने पंन्नास लाख किंमतीच्या वह्यांची विक्रमी विक्री झाली. यासाठी माझी मुलगी निवेदिता जाधव यांची मोलाची मदत झाली. ग्रामीण भागातील पालकांनीही या महोत्सवातून मोठ्या प्रमाणावर वह्या विकत घेतल्याने संयोजक नात्याने मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.