पुणेकरांची दुध सेवा विस्कळीत होणार

0

पुणे- दुधाला मिळणारे दर आणि एकूणच दुग्ध व्यवसायावर असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून दूध बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सोमवारपासून पुणेकरांसाठी दुधाचा पुरवठा विस्कळित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, दूध उत्पादकांनी दूध उपलब्ध केल्यास त्याची विक्री करण्याची जबाबदारी कात्रज दूध संघाने घेतली आहे.

दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणे शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार दूध उत्पादकांना मदत करते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने