आरोग्य मित्र ही देवदूतांची फॅक्टरी ठरेल ः आनंद पाटील

0

आरोग्य मित्र फाउंडेशनच्या पहिल्या तुकडीचा लोकार्पण सोहळा उत्साहात

पुणे ः समाज आणि आरोग्यदायी सेवा यामध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने आरोग्य मित्र फाउंडेशनची सुरुवात झाली आहे. फाउंडेशनचा ‘आरोग्य मित्र’ प्रशिक्षण वर्ग देवदूतांची फॅक्टरी ठरेल, असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी व्यक्त केले. आरोग्य मित्र फाउंडेशनच्या आरोग्य मित्र प्रशिक्षण वर्गाची सांगता आणि आरोग्य मित्रच्या पहिल्या तुकडीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी या आरोग्य मित्रांना प्रशिक्षण दिले आहे. आरोग्य मित्रचे प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य मित्रांना कार्यक्रमात प्रशस्ती पत्र देण्यात आले. तसेच कार्यक्रमात दुसर्‍या व तिसर्‍या आरोग्य मित्रच्या तुकडीची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, लोकमान्य हॉस्पिटल ट्रॉमाप्रमुख डॉ. अशिष सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आरोग्य मित्र फौंडेशनचे संचालक मंडळ तसेच डॉ. अभय कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. जयंत श्रीखंडे, निरामय हॉस्पिटलचे डॉ. श्रीरंग गोखले, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, डॉ. वर्षा डांगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. दिलीप कानडे आदी उपस्थित होते. आरोग्य मित्र फ़ाउंडेशन या संस्थेचे सर्व पदाधिकार्‍यांचा शपथ विधी सोहळा पार पडला. प्रथम आरोग्य मित्र व आरोग्य मित्र फ़ाउंडेशनचे सचिव कै. अनिल पालकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पहिले आरोग्य मित्र प्रकाश मिर्झापुरे, विठ्ठल बापु सहाणे, लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत पवार, स्वानंद राजपाठक, प्रताप घुगे, सुधीर पडाळे, राजेश ़फुलकर, विजयालक्ष्मी भावसार, मनीषा हिंगणे, गौरव वानखाडे, संदीप संपकाळ, अनंत कुलकर्णी, गणेश वाघचौडे, विजय इंगले यांना त्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षणपूर्ण केल्याबद्द्ल प्रशिस्त पत्रक देउन गौरवण्यात आले. प्रशिक्षण दिवंगत अनिल पालकर यांनी देखील प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नीने प्रशस्तिपत्रक स्वीकारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावसार यांनी केले.