मुंबई । भारता क्रिकेटचे धडे घेतलेला क्रिकेटपटू आता जर्मनीच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. त्याचे नाव ऋषी पिल्लई असे नाव आहे.त्याने भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज केदार जाधव जेव्हा पुण्यात टेनिस बॉल टूर्नामेंन्ट खेळायचा तेव्हा ऋषी त्याचा सहकारी होता.तो आता जर्मन क्रिकेटला भारतीय टच देण्याचा प्रयत्न करित आहे. भारतीय मुळे असलेला व पुण्यात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले.त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ऋषीने जर्मनीला केला.
आचेन या विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर तेथे राहला.क्रिकेटची ओढ त्याला स्वस्त बसू देत नव्हती.त्याला योगायोगाने संधी मिळाली.त्या संधीचा फायदा घेत जर्मन क्रिकेट संघाचा आधारस्तंभ झाला आहे. फुटबॉलचे वेड असलेल्या देशात जर्मनीत अन्य देशांमधून आलेल्यांना क्रिकेटप्रेमीना जमवून संघ निर्माण केला. ’जर्मनीतही क्रिकेट खेळले जाते, हे मला अनेक वर्षं माहीतच नव्हते. आम्ही काही भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचो. त्यातील एका सामन्यात मी चांगल्या धावा करून संघाला जिंकवले. तेव्हा, पाकिस्तानी संघातील सलमान नावाचा गोलंदाज माझ्याकडे आला आणि त्याने कोएल्न क्रिकेट क्लबकडून खेळण्याबाबत विचारले. त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता’, असा किस्सा ऋषीने सांगितला. 2008 पासून तो या क्लबसाठी खेळतोय. जर्मनीतील हा सर्वात यशस्वी क्लब मानला जातो.