पुणे-अहमदनगर महामार्गावर ‘माऊलीं’चा गजर

0

शिक्रापूर । कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीमध्ये होणार्‍या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. विविध भागातील पालख्याही आळंदीला जाण्यासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. पुणे-नगर महामार्ग या पालख्यांनी फुलून गेला होता. माऊलींच्या गजराने महामार्ग दुमदुमून गेला होता.शनिवारपासून या सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी विशेषतः विदर्भ, मराठवाड्यातून येणार्‍या दिंड्यांचे प्रमाण जास्त असते. या सर्व दिंड्या पुणे-नगर रस्त्याने आळंदीला जातात.

या दिंड्यासोबत पायी जाणार्‍या वारकर्‍यांसाठी ठिकठिकाणे चहा व नाश्त्याची सोय स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. शिक्रापूर येथे गेल्या 9 वर्षांपासून माउली सेवा मंडळाच्या वतीने दिंडीतील सर्व वारकर्‍यांसाठी चहा व नाश्त्याची सोय केली जात आहे. याहीवर्षी मलठण फाटा येथे कांताराम भुजबळ, मोहनशेठ विरोळे, संतोष चौरसिया व पाबळ फाटा येथे विनायक तकटे यांनी वारकर्‍यांचे स्वागत करून त्यांची चहा व नाश्त्याची सोय केली होती.