पुणे आयुक्तांच्या धर्तींवर नवीन नियमावली करा

0

निजामपुर । धुळे जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समितीत सुधारित नियमावली पुणे विभागाने अमलात आणली आहे. त्याच धर्तीवर लागू करावी अशी मागणी निजामपुरचे माजी उपसरपंच ताहीरबेग मिरजा यांनी पत्रव्दारे केली आहे. जिल्हा परिषद अतर्गत 4 पंचायत समिती 551 ग्रा.पं. आहे. यात धूळे तालुक्यात 168 गावे असून 142 ग्रा.पं. आहेत. सन 2001 जनगणनेनुसार लोकसंख्या 378300 इतके व साक्री तालुक्यात 227 पाडे 241 गावे, 168 ग्रा.पं. आहेत. लोकसंख्या 363092 इतकी आहे.

एका ग्रामसेवकाकडे दोनपेक्षा जास्त ग्रामपंचायतीची जबाबदारी नको
शेतकरी शेतमजूर महिला, मजूर व नागरिक विविध सरकारी व शैक्षणिक कामांसाठी विविध दाखल्यांसाठी ग्रामपंचायतीत सकाळी जात असतात. पंरतु, वेळेवर ग्रामसेवक हजर राहत नाही. ग्रामसेवक वेळेवर येत नाही किंवा मिटींगचा नावाने हजर राहत नाही. यासाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पंचायत समिती स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या सोमवारी ग्रामसेवकाची आढावा बैठक सभा आयोजित करणे बंधनकारक केले आहे. तसेच एका ग्रामसेवकाकडे दोन पेक्षा जास्त अधिक ग्रामपंचायतीची जवाबदारी नसावी अशी नियमावली केली आहे.

शासकीय वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेची गरजेची
नवीन नियमावली नुसार शेतकरी शेतमजुर,नागरिक व ग्रामस्थांना शेती व इतर व्यवसया निमित्त गावबाहेर शेतात व कामासाठी जाण्यापुर्वी त्यांना ग्रामपंचायतीतील कामासाठी येता यावे म्हणून ग्रामपंचायतीच्या कामाची शासकीय वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या ग्रामपंचायती तील ग्रामसेवकाचे कामाचे दिवस व पंचायत समितीस भेटीचा, मिटींग बैठकीचा दिवस यांचा फलक तयार करून तो ग्रामपंचायतीमध्ये दर्शनी भागावर ग्रामसेवकाने लावयचा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरण डी यांनी नविन सुधारित नियमावली तयार करून धुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या ग्रा.पं तीत लागू करावी अशी मागणी माजी उपसरपंच ताहीरबेग मिरजा यांनी केली आहे.