पुणे कॉंग्रेस भवन तोडफोडप्रकरणी १९ जणांना अटक

0

पुणे : मुळशी-भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झालेत. त्यांनी पुणे येथील कॉंग्रेस भावनाची तोडफोड करत गोंधळ घातला होता. याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात कॉंग्रेसची नाचक्की झाली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १९ जणांना अटक केली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील 19 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक केली आहे. मंगळवारी 20 ते 25 जणांनी काँग्रेस भवनची दगडफेक करत तोडफोड केली होती.

आमदार संग्राम थोपटे यांनी यावर मला काहीही माहित नाही. कोणी तोडफोड केली याची मी चौकशी करतो असे सांगितले होते.