नवी दिल्ली । रायझिंग पुणे सुपरजायंट आणि गुजरात लायन्स या दोन संघांचा करार फक्त दोन वर्षांसाठीच असून त्यांना 2018 च्या सत्रात पुनरागमन करायचे असल्यास त्यांना इतरांप्रमाणेच नव्याने बोली लावावी लागणार असल्याचे, इंडियन प्रीमिअर लीगचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी 2013 मध्ये बंदी घातल्यानंतर हे संघ पुढील वर्षी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पुणे आणि गुजरात या दोन संघांना मुदतवाढ मिळणार नाही. त्यांच्याशी दोन वर्षांचा करार झाला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून बंदी घातलेले दोन संघ 2018 ला पुनरागमन करतील.