पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीप पाटील

0

पुणे- पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सुवेझ हक यांची मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्तव्यदक्ष व पोलीस प्रशासनावर पकड असणारा अधिकारी अशी संदीप पाटील यांची ओळख आहे.

सातारा जिल्ह्यात अधीक्षक म्हणून कार्यरत असताना पाटील यांनी अवैध धंदे व बेकायदा वाळू वाहतूक विरोधात कठोर भूमिका घेतली होती. आता पुणे ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी रोखणे, अवैध धंदे बंद करणे, तसेच भूमाफियांचे साम्राज्य उधळून लावण्याचे मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे.