पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १६ हजार पार

0

पुणे:- मुंबईसह पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. मंगळवारी शहरात 820 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे पुणे जिल्ह्यातील रुग्ण संख्या १६ हजार ८५१ झाली आहे. आतापर्यंत शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात एकीकडे चाचण्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे प्रलंबित अहवाल येत असल्याने नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. रुग्णसंख्या रोज वाढत असल्याने भिती वाढली आहे.

पुणे शहरात मंगळवारी ३ हजार ४०२ चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९३ हजार ८०८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात एका दिवसात २७३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ७ हजार ९४५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.