पुणे । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि सायकलींचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहराने यंदा सर्वाधिक वाहनांचे शहर झाले आहे. यंदाच्या वर्षी मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या महानगरांपेक्षाही पुण्यामध्ये नवीन वाहनांची सर्वाधिक भर पडली आहे.
सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्रात
केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज ‘परिवहन’ या एकाच वेबपोर्टल आणि ‘वाहन 4’ या प्रणालीद्वारे केले जात आहे. देशातील 23 राज्यांच्या परिवहन विभागांचा यामध्ये समावेश आहे. या 23 राज्यात 1 जानेवारी ते 3 नोव्हेंबर या कालावधीत 81 लाख 78 हजार 824 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक वाहन नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 20 लाख 4 हजार 484 वाहनांची नोंदणी झाली आहे. त्या पाठोपाठ गुजरातमध्ये 13 लाख 8 हजार 782, पश्चिम बंगालमध्ये 8 लाख 41 हजार 253, हरियाणामध्ये 6 लाख 7 हजार 860, दिल्लीला 5 लाख 58 हजार, उत्तर प्रदेशात 5 लाख 62 हजार 207, राजस्थानमध्ये 5 लाख 41 हजार आणि झारखंडमध्ये 4 लाख 55 हजार वाहनांची नोंदणी झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधून 1 लाखांची नोंद
‘वाहन 4’ नोंदणी अहवालामध्ये आरटीओ कार्यालयनिहाय माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक कार्यालयात सर्वाधिक 2 लाख 21 हजार 980 वाहनांची नोंदणी झाली आहे. अहमदाबाद आरटीओ 1 लाख 65 हजार 624, सुरत आरटीओ 1 लाख 62 हजार 96 आणि पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 1 लाख 18 हजार 878 वाहनांची नोंदणी झाली आहे.
शहरात 2 लाख 21 हजार 980 वाहनांची नोंद
दरम्यान, अद्यापही काही राज्यांमध्ये पूर्णतः किंवा काही आरटीओ कार्यालयांमध्ये ‘वाहन 4’ ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या वाहन नोंदणीचा यामध्ये समावेश नाही. ‘वाहन 4’ नोंदणी अहवालामध्ये आरटीओ कार्यालयनिहाय माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक कार्यालयात सर्वाधिक 2 लाख 21 हजार 980 वाहनांची नोंदणी झाली आहे. अहमदाबाद आरटीओ एक लाख 65 हजार 624, सुरत आरटीओ एक लाख 62 हजार 96 आणि पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एक लाख 18 हजार 878 वाहनांची नोंदणी झाली आहे.