पुणे । पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने, तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने गेली तीन वर्षे पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाची राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सायकल स्पर्धा शनीवारी रंगणार असून देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 350 सायकलपटू यामध्ये सहभागी होणार आहेत. राज्य पातळीवरील स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील मिळून 400 स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, सेनादल, चंदीगड, दक्षिण-मध्य रेल्वे, उत्तर-पूर्व रेल्वे, एअरफोर्स, तामिळनाडू, बिहार, गुजरात, मध्य रेल्वे, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील सायकलपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या वर्षी सायकल स्पर्धेत अतुल कुमार, सतीशकुमार, दिलीप माने (सांगली), अझिझ कुरबु (सांगली) गणेश पवार, ऋतुजा सातपुते व मागील वर्षीचा विजेता सदबिरसिंग हे खेळाडू सहभागी होणार आहेत.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुणे ते बारामती शर्यत 120 कि.मी (दोन टप्प्यात) असेल. सासवड ते बारामती एमटीबी सायकलची पुरुषांसाठी खुली स्पर्धा (85 किमी राज्यस्तर), 4) माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीय स्तर (15 किमी) आणि 5) माळेगाव ते बारामती महिलांसाठी राज्यस्तर (15 किमी) अशा पाच गटांमध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये यशस्वी व सहभागी होणार्या सायकलपटूंना एकूण पाच लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. दिवेघाट प्रथम पार करणार्या स्पर्धकास घाटाचा राजा हा पुरस्कार देण्यात येणार असून जेजुरी येथे येणार्या प्रथम स्पर्धकास जय मल्हार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे तर प्रथम तीन सायकलपटूंस रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
मुख्य सायकल स्पर्धा हडपसर ते बारामती या मार्गावर होणार असून ही स्पर्धा हडपसरपासून सकाळी 9.30 वा सुरू होऊन वडकी नाला – दिवे घाट – सासवड – जेजुरी – वाल्हे – निरा ;डावीकडे वळूनद्ध- सोमेश्वरनगर – वडगाव निंबाळकर – कोहाळे – पणदरे – माळेगाव या मार्गे जाउन विद्या प्रतिष्ठान बारामती येथे समाप्त होणार आहे.