पुणे-दानापूर एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल लांबवला

0

भुसावळ- पुणे-दानापूर एक्स्प्रेस गाडीच्या जनरल डब्यातून प्रवास करीत असलेल्या आशिषकुमार घोलप प्रसाद (रा.भरवरशीगडा, उत्तर प्रदेश) हे पुणे ते माणिकपूर असा मंगळवारी प्रवास करीत असतांना त्यांच्या झोपेचा फायदा घेत त्यांचे सुमारे 19 हजार 998 रुपये किंमतीचे मोबाईल दौंड स्थानक सुटल्यानंतर ही चोरी झाली. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून तो दौंड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.