पुणे-नगर महामार्गावर वाहतूककोंडी

0

पुणे । पुणे-नगर महामार्ग नेहमीच वर्दळीचा आहे. परंतु मंगळवारचा दिवस हा वेगळाच होता. नेहमीप्रमाणे या रस्त्यावर रोजच्यापेक्षा अधिक वाहने ये-जा करत होती. शिक्रापूरनजीक दुपारी एक नंतर ते सायंकाळी आठच्या दरम्यान वाहनांची तोबा गर्दी दिसून येत होती. त्यामध्ये सर्वाधिक पुण्याच्या दिशेने जाणारी लेनवर वाहनांची वर्दळ अधिक दिसून येत होती.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची सुटी झाल्याने वाहनांची अधिकच गर्दी झाली. पाबळ फाटा व चाकण चौक येथे दिवसभर रस्ता ओलांडने अनेकांना जिकिरीचे झाले होते. त्याचबरोबर महत्त्वाच्या चौकांनी काही काळ वाहतूक ठप्पही होत होती. परंतु वाहतूक पोलिसांमुळे तात्काळ रस्ता मोकळा होण्यास मदत होती. त्यातच विवाह समारंभ सुरू झाल्याने विवाहाच्या वेळेत पोहचण्यासाठी स्थानिक वाहनचालकविरुद्ध दिशेने वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे पुणे व नगरकडे जाणार्‍या दोन्ही बाजूला बराचवेळ वाहतूक जागेवरच ठप्प झाली होती.त्यातच अवैध प्रवासी करणारी वाहने पाबळ चौकात रस्त्याच्या मधोमधच प्रवासी भरण्यासाठी उभी करत असल्यामुळे वाहतूककोंडीत आणखीनच भर पडत होती.त्यामुळे हा अवैध वाहनांचा थांबा तात्काळ बंद करावा अशी मागणी प्रवास करणार्‍या वाहनचालकांकडून होत होती.