पुणे-नाशिक महामार्गाजवळील सेवा रस्त्यांच्या नाल्यांची होत नाही नियमित स्वच्छता

0
चाकणमधील सेवा रस्ते पाण्यात
आयआरबीच्या नालेसफाईचे पितळ उघडे
चाकण : चाकण परिसरात पुणे-नाशिक महामार्गाजवळील  सेवा रस्त्यांच्या नाल्यांची नियमित स्वच्छता होत  नसल्याने त्यांचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे  पाणी वाहून जाण्यास कशी अडचण निर्माण होते  याचा अनुभव रविवारी (दि.16) दुपारी झालेल्या  मुसळधार पावसाने आला. सेवा रस्त्यांच्या  जवळच्या गटारींची योग्य स्वच्छता न झाल्याने  घाण, कचरा नाल्यात साचत गेला असून हे नाले  बंद झाले आहेत. मागील महिन्यात आयआरबी कं पनीकडून या गटारी मोकळ्या करण्याचा  थातुरमातुर प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या  स्वच्छतेचे पितळ रविवारी झालेल्या मुसाधार  पावसाने उघडे पाडले आहे. तळेगाव चौक आणि  आणि आंबेठाण चौक येथे सेवा रस्त्यांची अवस्था  अत्यंत दयनीय झाली असून पाणी वाहून जाण्यास  वाट नसल्याने या भागात पावसाच्या पाण्याचा  निचराच होत नसल्याची स्थिती पुन्हा एकदा  समोर आली आहे. मागील महिन्यात या  महामार्गावर टोल वसुली करणार्‍या आयआरबी कं पनीने सेवा रस्त्यांच्या लगतच्या गटारी मोकळ्या  करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये अनेक  ठिकाणी संबंधित गटारे बंद झाल्याची विपर्यस्त  स्थिती समोर आली आहे.
अर्धवट कामामुळे पाणी तुंबते
याबाबत जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते निलेश क ड-पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी  पावसाळ्यात नागरिकांना याचा पुन्हा-पुन्हा याचा  प्रत्यय येत आहे. आयआरबी कंपनीने केलेल्या  अर्धवट स्वच्छतेमुळे पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबले  आहेत. पावसाळ्यात विशेषतः मुसळधार पाऊस  झाल्यानंतर ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर  तुंबणार्‍या पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने  ‘ड्रेनेज’ची व्यवस्था आयआरबी आणि स्थानिक  नगरपरिषद व त्या-त्या भागातील ग्रामपंचायती  यांनी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  योगेश वाडेकर यांनी केली आहे. आयआरबी आणि चाकण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून  या बाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सेवा रस्ते गेले पाण्याखाली
चाकण नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शिवाजी  मेमाणे यांनी सांगितले की, चाकणमध्ये सेवा  रस्त्यांवर अवतरलेल्या नद्यांना आयआरबी कंपनी  जबाबदार आहे. त्यांनी केलेल्या नालेसफाईमुळे  असलेली गटारे बंद झाली. त्यामुळे रविवारी  झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा सेवा  रस्ते आणि महामार्ग पाण्याखाली गेला. सेवा  रस्त्यांचा भाग आयआरबीच्या अखत्यारीत येत  असल्याने त्यांनी याबाबतच्या उपयोजना केल्या पाहिजेत.