पुणे-पिंपरी चिंचवडची जीवनवाहिनी पीएमपीएमएल पुन्हा धावणार

0

पुणे: कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाटी हा निर्णय घेण्यात आला होता. तब्बल ५ महिन्यांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले पीएमपीएमएल पुन्हा सुरु होणार आहे. पुढील आठवड्यापासून पीएमपीएमएल पुन्हा रस्त्यावर धावणार आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.