पुणे : आपुलकी संस्था पुणे तर्फे जेष्ठ नागरिकांसाठी डिजिटल इंडिया माध्यमातून डिजिटल साक्षरते बाबत कार्यशाळा घेण्यात आली . या वेळी आनंद नगर भागातील दत्त मंदिरात येणाऱ्या दत्त जेष्ठ नागरिक मंडळातील जेष्ठांना सुरक्षितते बाबत मार्गदर्शन करण्यात आले.तर सिंहगड रोड चे पोलीस अधिकारी जीवन मोहिते यांनी जेष्ठ नागरिकांनी घरातून बाहेर पडताना काय काळजी घ्यावी तसेच महिलांनी देखील बाहेर पडताना दागिने वापरताना काय काळजी घ्यावी, बैंकेचे व्यवहार कश्या प्रकारे काळजी घ्यावी . तसेच जेष्ठ नागरिकंसाठी ची 1090 या नंबर ची हेल्प लाइन असुन त्याचे कार्य तसेच पोलिसांकडून मिळणारे सहकार्य या बद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
या दत्त मंदिर येथील जेष्ठ नागरिक मंडळातील सर्वजण कायम एकमेकांचे वाढदिवस हे मोठया उत्साहात एकत्रित येऊन साजरे करतात. तसेच अनेक सहली आयोजन करतात. दररोज संध्याकाळी मंदिरात आरती साठी एकत्र येऊन अनेक विषयावर चर्चा करतात, एकमेकांच्या सुख दुखांत सहभागी होतात अश्या या जेष्ठांकडून तरुणांना देखील लाजवतील अशी ऊर्जा आणि प्रेरणा नक्कीच घेण्या सारखी आहे .
यावेळी वेगवेगळे नावीन्य पूर्ण उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते आपुलकी , पुणे चे समीर रुपदे आणि पोलिस यांच्या कार्य तत्परते बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन नागरिकांपैकी पांडुरंग बरसोड़े , अजय जोशी , प्रकाश कदम , साने काका भालचंद्र कोद्रे , कांबळे , परचुरे , शिरोडकर ,विलास देशपांडे , वसंत कुलकर्णी केले.