पुणे-बारामती सायकल स्पर्धेत कर्नाटकचा श्रीधर सावनूर विजयी

0

पुणे । पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील 122 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेमध्ये कर्नाटकचा श्रीधर सावनूर याने बाजी मारली. श्रीधरने पुणे ते बारामती हे अंतर त्यांनी 2 तास 40 मिनिटे 30 सेकंद या कालावधीत पार केले. या स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकावर कर्नाटक च्या मल्लाप्पा मुर्तान्नवर यांचा आला असून त्यांनी 2 तास 40 मिनिटे 30 सेकंद इतक्या कालावधीत पार केले. तर एससीआरमधील जीथा रामगट हे तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले.श्रीधर सावनूर यांना किंग ऑफ घाट हा किताब मिळाला असून त्यांनी दिवे घाट सर्वात आधी पार केला तसेच सासवड पर्यंतच्या 25 किमी स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला.

विवेकानंद ठरला घाटाचा राजा
राज्यस्तरावरील घाटाचा राजा स्पर्धेत विवेकानंद घाडगे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. राज्यस्तरीय पुरुष गटातील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बारामतीचा विनित सावंत याने पटकाविला त्याने हे अंतर 2 तास 40 मिनिटे 30 सेकंदात पार केले. द्वितीय क्रमांक अहमदनगरच्या श्रीनिवास लोंढे याचा असून त्याने हे अंतर 2 तास 41 मिनिटे 01 सेकंदात पार केले.

तृतीय क्रमांक अहमदनगरच्या संकल्प थोरात याचा असून त्याने हे अंतर 2 तास 41 मिनिटे 01 सेकंदात पा र केले.राज्यस्तरीय माळेगाव ते बारामती 15 किमी महिलांच्या स्पर्धेमध्ये नाशिकची अंजू घुले हिचा प्रथम क्रमांक, पुण्याच्या प्रिया दोडके हिचा द्वितीय क्रमांक तर नाशिकच्या सिया ललवाणी हिचा तृतीय क्रमांक आला.राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेमध्ये महिलांमध्ये केरळ येथील सायोना पो प्रथम क्रमांक, पुणे येथील पूजा डूनोले द्वितीय क्रमांक, तर पुणे येथील प्रणिता सोमण तृतीय क्रमांकाचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मुलांमध्ये 85 कि.मी. एमटीबी सायकल स्पर्धेमध्ये सांगली येथील मच्छींद्र पवार प्रथम आला.