पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या सोमवारी ते पदभार घेणार आहे. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आणि बिलोलीकर एकत्रितपणे करोनाच्या लढाईत सक्रिय राहतील, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले आहे. बिलोलीकर जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांना आरोग्याविषयी अनुभव आहे.
करोनाबाधित कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यात दोन सहायक आरोग्य अधिकाऱ्यांना करोना झाल्याचे समोर आले. आरोग्य प्रमुख आणि पाच सहायक आरोग्य प्रमुखांपैकी तिघे जण आजारी पडले आहेत.