पुणे – महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या गळतीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शुक्रवारी महापालिकेत छत्री, रेनकोट घालून आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी इमारत गळतीविरोधात छत्र्या, रेनकोट घालून जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. तसेच या निकृष्ट कामाला जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी केले. याबाबतचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.