पुणे: राज्यात पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र राज्य सरकारकडून पुणे मनपाला एक पैसाही देण्यात आलेला नाही असे गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एबीपी माझ्या वृत्तवाहिनीच्या “माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन” या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामगिरीवर टीका केली.
मुंबईत रुग्णांची संख्या वाढेल या भीतीने राज्य सरकार कमी तपासणी करत आहे असे आरोपही फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रात अधिक तपासणीची आवश्यकता आहे मात्र सरकारकडून ते होत नसल्याचे त्यानी सांगितले. राज्यातील मृत्यू दर लपविले जात आहे. मृतांची खरी आकडेवारी सांगण्यात येत नसल्याचे आरोप त्यांनी केले.