पुणे मनपाचा भोंगळ कारभार उघड; गॅलरी भागातील स्लॅप कोसळले

0

पुणे-महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करीत उदघाटन केले. स्वत:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या इमारतीच्या उदघाटनाला उपस्थिती देत उदघाटन केले. परंतु यावेळी मनपाचा भोंगळ कारभार उघड झाला मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताच पाणी गळती सुरु झाल्यानंतर मनपाचा भोंगळ कारभार उघड झाला. दरम्यान आज मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाले आहे. पालिकेच्या गॅलरी भागातील स्लॅप कोसळले आहे. यावरून पुन्हा मनपा टीकेची धनी बनली आहे.

नगरसेवकांनी केले छत्री आंदोलन 

महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उदघाटनाच्या वेळी झालेल्या गळतीविरोधात सर्व पक्षांच्या सदस्यांनी पालिकेतील सभागृहात छत्र्या घेऊन सत्ताधारी भाजपचा निषेध करत आंदोलन केले. नव्या इमारतीतील गळतीवर चर्चा झालीच पाहिजे असे म्हणत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने इमारत गळतीविरोधात छत्र्या घेऊन जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. तसेच या निकृष्ट कामाला जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी सर्व पक्षीय सदस्यांनी केले.