पुणे: महापालिकेच्या चालू वर्षीच्याअंदाजपत्रकात शहरातील विविध विकासकामांसाठी प्रस्तावित असलेली ६० कोटीहून अधिक रुपयांची रक्कम प्रभागातील लहान-मोठय़ा कामांसाठी वळविण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने ६0 कोटी रुपयांची ही रक्कम वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. एकूण पावणेतीनशे प्रस्तावांच्या माध्यमातून ६0 कोटी रुपयांचा अंदाजपत्रकातील निधी वळविण्यात आला आहे.
प्रामुख्याने रस्ते, विद्युत व्यवस्था, पदपथ तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी प्रस्तावित असलेला हा निधी ज्यूट बॅग खरेदी करणे, प्रभागासाठी बाके खरेदी करणे, सांडपाणी वाहिन्या बदलणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभागात विद्युत व्यवस्था करणे अशा कामांसाठी वळविण्यात आला आहे. किमान सात लाख रुपयांपासून ते तब्बल एक कोटी ५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्यासाठी वर्ग करून घेण्यात आली आहे.