पुणे महापालिकेतील भाजप सत्ताधार्‍यांचा पीएमपी घोटाळा

0

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे निषेध आंदोलन

हडपसर : पीएमपीएमएलच्या ई बस टेंडरमध्ये केलेल्या कोट्यावधीच्या घोटाळ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेस पक्षनेते अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भाजपा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मा.आ. मोहन जोशी, नगरसेवक सुभाष जगताप, अभय छाजेड, नगरसेविका सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, नगरसेवक वनराज आंदेकर, युसुफ शेख, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष राकेश कामठे, युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल मलके, कसबा अध्यक्ष विनायक हनमघर, सामाजिक न्याय अध्यक्ष बापु डाकले, ओ.बी.सी अध्यक्ष संतोष नांगरे, युवती अध्यक्ष मनाली भिलारे, अजय दराडे, फहिम शेख, महेश हांडे, डॉ. सुनिता मोरे, अच्युत लांडगे, प्रेम भांडे, संजय लोणकर, राहुल लोणकर, हरीष लडकत, विक्रम मोरे, सागरराजे भोसले, मृणालिनी वाणी, हेमंत येवलेकर, प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते.

निवीदा प्रक्रीया रद्द करावी…

यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले, ई बस टेंडरमध्ये घोटाळा झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हि ई बस नसून घोटाळा बस आहे. म्हणून ही निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या टेंडरमुळे पुणेकरांचा तोटा होणार आहे. घोटाळेबाज सत्ताधारी भाजपा पीएमपीएल मोडीत काढून मालामाल होऊ पाहत आहेत. हे ई बस टेंडर रद्द न केल्यास या बसच्या उद्घाटन वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन बसमधून प्रवास करतील. काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे म्हणाले, या बस टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे ही खरेदी थांबवावी. अन्यथा काँग्रेस पक्ष याविरोधात कोर्टात जाईल.