पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण !

0

पुणे: पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबियांची देखील तपासणी करण्यात आली. त्यात त्यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी त्यांनी विविध बैठका घेतल्या, या दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. दुसरीकडे हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातीचे आमदार मुक्त टिळक यांच्या वडिलांचे देखील कोरोनाने निधन झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक माजी विरोधीनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले. आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नीवर कोरोनाचा उपचार सुरु आहे.