पुणे: पुणे मेट्रोच्या कामादरम्यान महापालिकेच्या जलवाहिनीला धक्का लागून ती फुटल्याची घटना कर्वेरोड घडली. कर्वे रस्त्यावरील स्वप्ननगरी सोसायटीसमोर ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे शुक्रवार व शनिवारी सोसायटीतील रहिवाशांचे पाण्याविना हाल झाले. गुरुवारी शहरात पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार होता.