पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे !

0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची पुणे विभागाच्या म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकतीच कलाटे यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना-भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात युती झाली आहे. त्यानंतर सरकारने विविध महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महामंडळावर घेऊन खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची पुणे विभागाच्या म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, युती झाल्यानंतर शिवसेनेने महापालिकेतील सत्तेत सहभाग मागितला आहे. भाजपने देखील सत्तेत सहभाग देण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिकेत देखील शिवसेना सत्तेत सहभागी होईल.