पुणे । मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणार्या पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान ब्लॉक ठेवण्यात येणार आहे. 1 ते 28 फेब्रुवारीदरम्यान दररोज दुपारी तीन तासांचा हा ब्लॉक असणार आहे. सिग्नल दुरुस्ती, इंजिनीअरिंगची कामे या ब्लॉकच्या अंतर्गत करण्यात येणार आहेत. यामुळे चार लोकल महिनाभर रद्द करण्यात आल्या आहेत.
केडगाव पुलाचा वापर करा
5 ते 18 फेब्रुवारीदरम्यान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान हे रेल्वे फाटक वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी खामगाव फाटक व केडगाव पुलाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
फाटक 14 दिवस बंद
पुण्याहून लोणावळ्याला दुपारी 12.15 व 1 आणि लोणावळ्याहून पुण्याकरिता दुपारी 2 व 3.40 वाजता सुटणार्या लोकल रद्द केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणार्या पुणे ते दौंड मार्गावरील यवत ते केडगाव स्थानकांदरम्यान फाटक क्रमांक 10 येथील खुटबाव फाटक देखभाल-दुरुस्तीकरिता 14 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.