पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज पदवीप्रदान सोहळा आहे. यावर्षी पहिल्यांदा पदवीप्रदान सोहळ्याला ड्रेस-कोड ठरविण्यात आला आहे. कुडता, पायजमा आणि उपरणे असा भारतीय पोशाख असणार आहे. गणवेशात पुणेरी पगडीचा समावेश करावा की फुले पगडीचा यावरुन वाद निर्माण झाला होता. पुणेरी पगडी की फुले पगडी यावरुन सुरु असलेला वाद चिघळला. पदवीदान सोहळ्यादरम्यान पुणेरी पगडीला विरोध दर्शवत चार विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवीन पोशाखाने घेतली. विद्यापीठ प्रशासनाने पदवीप्रदान कार्यक्रमासाठी वर्षांनुवर्षे असलेला हा पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.