पुणे विद्यापीठातील कमवा शिका योजनेच्या तीन समन्वयकांवर गुन्हा दाखल

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कमवा शिका योजनेच्या तीन समन्वयकांवर ३ लाख ४६ हजार ८६० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात त्या गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थ्यांची खोटी नावे दाखवून परस्पर पैसे लाटले असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी विद्यापीठातर्फे एका ४३ वर्षीय शिक्षकाने फिर्याद दिली आहे. फियार्दी सावित्रीबाई फुले विद्यापीठात संचालक विद्यार्थी विकास मंडळ (अतिरिक्त कारभार) या पदावर कार्यरत आहेत. यातील कमवा शिका योजनेतील तीन समन्वयकांनी संगनमत करुन विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील, कमवा आणि शिका योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे देऊन, त्यांच्या नावे असलेले पैसे स्वत:च्या बॅँक खात्यावर घतले. तर काही विद्यार्थी हे कमवा शिका योजनेत काम करत नसताना, त्यांना या योजनेतील विद्यार्थी दाखवून त्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकून नंतर ते पैसे रोख स्वरुपात घेतले. याप्रकारे विद्यापिठाची ३ लाख ४६ हजार ८६० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. दराडे करत आहेत. विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी विविध जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेश घेतात. हे विद्यार्थी या योजनेत सहभाग घेतात. मात्र समन्यकांनी प्रत्यक्ष काम न करणाºया विद्यार्थ्यांची नाव देऊन विद्यार्थ्यांचा मानधनाच्या स्वरुपात मोबदला काढला. हा मोबदला तिघा समन्वयकांनी लाटला. योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली होती. त्यांनी दखल घेत माजी कुलगुरु डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीला लेखी व ठोस स्वरुपात पुरावे मिळाले होते. यानंरत चौकशी समितीने अहवालात हा गैरव्यवहार अतिशय गंभीर स्वरुपाचा असून मागील अनेक वर्षे चाललेला आहे.