पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात नवीन पोशाखाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळा आज झाला. यासाठी विशेष ड्रेसकोड ठेवण्यात आलेला होता. यावरून वाद पेटला आहे.
पदवीप्रदान समारंभ सुरु असताना नवीन पोशाख आणि पगडीवरून अन्य विद्यार्थी संघटनांनीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.