पुणे विभागातील पावणेपाच लाख लोकांचे स्थलांतर !

0

मुंबई: मागील दोन आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले होते. याचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला, त्यात पुणे विभागातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील ५८४ गावांमधून तब्बल ४ लाख ७४ हजार २२६ जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आतापर्यंत या महापुरात संपूर्ण महाराष्ट्रात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप पर्यंत ३ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. निर्वासित लोकांसाठी ५९६ निवारा शिबिर स्थापन करण्यात आले आहेत.