पुणे विमानतळावरून सव्वाकोटींचे सोने जप्त

0

पुणे । पुणे विमानतळावरून एक कोटी 38 लाख रुपये किमतीचे चार किलो 678.14 ग्रॅम वजनाचे सोने केंद्रीय सीमा शुल्क विभागाकडून शुक्रवारी जप्त करण्यात आले आहे. हे सोने दुबईवरून तस्करीच्या मार्गे आणण्यात आले होते. या प्रकरणी महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. रफतजहाँ शौकात अली, असिफ खान, मोहम्मद अश्फाक महोम्मद कासिम आणि हुसेन सय्यद अहमद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुबईवरून पुणे विमानतळावर विमान आल्यानंतर प्रवाशांच्या बॅगांची तपासणी सुरू केली. त्यामध्ये रफतजहाँ हिच्या बॅगेत सोन्याचे बिस्कीट, रेडीयम वायर असे 2 किलो 467.87 ग्रॅम वजनाचे सोने सापडले. खानकडे याचपद्धतीचे 1 किलो 674 ग्रॅम, मोहम्मदकडे 233.44 ग्रॅम, हुसेनकडे 311.21 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले.