पुणे-वैष्णोदेवी-कटरासाठी सुपरफास्ट विशेष गाडीची सुविधा

0

भुसावळ। जम्मू-काश्मिर स्थित वैष्णोदेवी दर्शनासाठी जाणार्‍या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे ते वैष्णोदेवी, कटरा दरम्यान 4 वातानुकुलित साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

यात विशेष गाडी क्रमांक 02135 वातानुकुलित सुपरफास्ट विशेष गाडी 9 ते 16 आक्टोबर दरम्यान दर बुधवारी पुणे येथून पहाटे 5.15 वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी रात्री 8.25 वाजता माता वैष्णो देवी कटरा पोहचेल. परतदरम्यान, गाडी क्रमांक 02136 वातानुकुलित सुपरफास्ट विशेष गाडी 11 ते 18 ऑक्टोबर दरम्यान माता वैष्णोदेवी कटरा येथून पहाटे 5.40 वाजता रवाा होऊन दुसर्‍या दिवशी रात्री 8.25 वाजता पुणे पोहचेल. ही गार्डी मार्गत लोनावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, मथुरा, दिल्ली, सफदरजंग, अंबाला कँट, लुधियाना, जलंदर कँट, पठानकोट काँट, जम्मू तावी आणि उधमपुर स्थानकांवर थांबेल. गाडीत 14 एसी 3-टियर डबे असतील. प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.