भुसावळ- रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने पुणे व जबलपूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ विभागातून या गाड्या धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साप्ताहिक पुणे-जबलपूर एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 01655 पुणे-जबलपूर एक्स्प्रेस दर मंगळवारी सकाळी 10.45 वाजता सुटून दुसर्या दिवशी पहाटे 6.15 वाजता जबलपूर येथे पोहोचणार आहे. 29 जानेवारीपर्यंतच ही गाडी चालवण्यात येणार आहे तर गाडी क्रमांक 01656 जबलपूर-पुणे एक्स्प्रेस दर रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सुटून दुसर्या दिवशी दुपारी 2.5 वाजता पुणे पोहोचेल व ही गाडी केवळ 27 जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार आहे. या गाडीला दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी टू टायर, चार एसी तीन टायर, दहा स्पलीप क्लास व एक सर्वसाधारण डबा असणार अहे. 3 जानेवारीपासून या गाडीचे आरक्षण रेल्वेच्या संकेत स्थळावरून तसेच पीआरएस केंद्रावरून प्रवाशांना करता येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.