नवी दिल्ली । रायझिंग पुणे सुपरजायंट्स’ (आरपीएस) या संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी यासंदर्भातील घोषणा केली. येत्या आयपीएल मोसमासाठी आरपीएस संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्मिथ याच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आयपीएल मोसमाच्या अखेरपासून यासंदर्भातील विचार माझ्या मनात घोळत होता. मी याविषयी संघ व्यवस्थापनाशीही चर्चा केली आहे. संघासाठी आता तरुण कर्णधार असावा, असा आमचा विचार आहे. संघामध्ये तारुण्य व अनुभवाचे चांगले मिश्रण आहे आणि आता संघास नव्या कल्पनांसहित पुढे घेऊन जाणारा तरुण कर्णधार आम्हांस हवा आहे,” असे गोयंका म्हणाले.