पुणे-सातारा रोडवर एसटीचा अपघात

0

पुणे । ट्रकने एसटी व कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी 1.30 च्या सुमारास पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडीजवळ घडली. यामध्ये कारमधील 4 तर बसमधील 21 जण किरकोळ जखमी झाले.

सातारा रोडवर शिंदेवाडीजवळ भोरकडे जाणार्‍या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने एसटी आणि मारुती कारला जोरात धडक दिली. त्यानंतर ट्रक आणि एसटी ही दोन्हीही वाहने रस्त्याच्या बाजूला असणार्‍या पुलाजवळच्या खड्यात जाऊन पडली. या अपघातामुळे सातार्‍याकडे आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जखमींवर खेड शिवापूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.